एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सुरुवातीला आपण मंत्रिमंडळात नसणार असं सांगितलं होतं त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात काम करणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिपदी काम करावं लागलेल्याची, ही काही पहिलीच घटना नसली तरि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे फडणवीस नाराज असल्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असली तरि पक्षाशी एकनिष्ठता व पक्ष संस्कार देवेंद्र फडणवीस यांनी पाळल्याने त्यांचं मोठं कौतुक देखील होतं आहे. अशात त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हटलंय गिरीश महाजन यांच्या शुभेच्छा संदेशात…
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर ट्विटर वर विशेष शुभेच्छा देतांना म्हटलं आहे की,”महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील अनभिषिक्त सम्राट“.. मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस.. आपले राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !आपल्या भक्कम नेतृत्वात राज्याची सदोदित सेवा व प्रगती घडो ! अशा भावना देखील व्यक्त केल्या आहेत. तर आभाळा एवढे मन..मा. देवेंद्रजी तुमच्या दिलदारपणाला सलाम…असं देखील गिरीष महाजन यांनी ट्विट केलं आहे.
हे सुद्धा वाचा…..
उद्धव ठाकरे यांनी दिल्या नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा… काय म्हटले वाचा
एकनाथराव खडसेनां असं ‘स्वप्नात’ही वाटलं नव्हतं ; फडणवीसांना खोचक टोला
"महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील अनभिषिक्त सम्राट".. मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस.. आपले राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
आपल्या भक्कम नेतृत्वात राज्याची सदोदित सेवा व प्रगती घडो !@Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/e0o9wzDuuo
— Girish Mahajan (@girishdmahajan) June 30, 2022