जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक, कवी, समीक्षक पोलीस नाईक विनोद अहिरे(Vinod Ahire) यांचा नुकताच ‘हुंकार वेदनेचा’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, विनोद अहिरे हे आपल्या खाजगी कामानिमित्त मुंबई येथे गेले असता त्यांनी मुंबईचे सह पोलीस आयुक्त कायदा-सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला ‘हुंकार वेदनेचा’ काव्यसंग्रह भेट दिला. नागरे पाटील यांनी काही कवितांचे अवलोकन केले असता ते अहिरेंना म्हणाले की, आपल्या कविता नुसत्याच रंजन करणाऱ्या नसून तर त्या वास्तववादी,अत्यंत मार्मिक, पोलिसांचा धैर्याचा शौर्याचा, त्यांच्या बलिदानाच्या कथा सांगणाऱ्या आहेत त्या भावी पिढीला प्रेरणा देतील. अशा शब्दात अहिरे यांचे कौतुक करून पुढील साहित्य प्रवासा साठी शुभेच्छा दिल्या.
या अगोदर देखील विनोद अहिरे यांचा ‘मृत्यू घराचा पहारा’ या पुस्तकाला विश्वास नागरे पाटील यांनी प्रस्तावना लाभलेली आहे. त्याचबरोबर विनोद अहिरे यांच्या फिटनेसचे देखील विश्वास नागरे पाटलांनी प्रशंसा केली.