औरंगाबाद : हल्लीच्या तरुणाईमध्ये नैराश्य वाढत असल्यामुळे तरुणांमधील आत्महत्येचं प्रमाणही वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात औरंगाबाद शहरातील पिसादेवी भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
वैष्णवी किशोर सोनवणे वय-१७ (रा.मूळ भोकरदन,ह. मु.पिसादेवी, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव आहे. वैष्णवीचे वडील किशोर सोनवणे हे शासकीय सेवेत मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील हे कुटुंब वैष्णवीच्या शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास होते. सोनवणे यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन आपत्ये आहेत. वैष्णवी अभ्यासात अत्यंत हुशार होती. त्यामुळे तिला त्यांनी उच्चशिक्षण देण्याचे ठरवून नीट परिक्षेसाठी तयारी सुरू होती.
नित्याप्रमाणे वैष्णवीने सोमवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत गेली. उशिरापर्यंत ती अभ्यास करीत होती. रोज सकाळीच उठणारी वैष्णवी का झोपेतून उठली नाही हे पाहण्यासाठी घरचे तिच्या खोलीत गेले तेव्हा तिने फॅनच्या हुकाला गळफास घेतल्याचे समोर आले.
हे देखील वाचा :
शिंदेंच्या बंडखोरीवरून एकनाथ खडसे यांचे मोठे विधान ; म्हणाले..
आयुध निर्माणी वरणगाव येथे विविध पदांसाठी भरती, इतका मिळेल पगार
राज्यपालांचा ठाकरे सरकारला झटका : तातडीने पत्र लिहून दिल्या ‘या’ सूचना
भाजप-शिंदे गटात सरकार स्थापनेच्या चर्चा ; खाते वाटपही ठरले?
सकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.