मुंबई : राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर कृपादृष्टी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात आतार्यंत सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात बरसलेला आहे. ज्या भागातून राज्यात आगमन झाले त्याच विभागात मान्सूनने कृपादृष्टी दाखवलेली आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगावसह इतर भागात पावसाने हजेरी लावल्याने आता कुठे खरीप पेरण्यांना सुरवात झाली आहे. असे असतानाही अजून कोकणावर मान्सून मेहरबान असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाच दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकण,मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा :
पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत सरकार करू शकते मोठी घोषणा
गुडन्यूज : अखेर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या तारखेपासून पुन्हा धावणार
अबब.. ड्रग इन्स्पेक्टरच्या घरातून करोडो रुपयांचे घबाड, पैसे मोजण्यासाठी बोलावली लागली मशीन
कोकणातील पावसामध्ये सातत्य राहणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात सरासरीप्रमाणे पावसाने हजेरी लावलेली असली तरी उर्वरित राज्यात मात्र मान्सूनने निराशा केली आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पेरण्या सोडा खरीपपूर्व कामेही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे भविष्यात केव्हा पेरण्या होतील याबाबत शेतकरीही अनभिज्ञ आहेत. असे असतानाही आगामी चार दिवस मराठवाड्यातील शेतकऱ्यांची निराशा होणार आहे.