भुसावळ : आषाढी एकादशीचे औचित्य साधून देशभरातील हजारो विठ्ठल भाविक पंढपूरात लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. भाविक प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने विदर्भ आणि खान्देशातील वारकर्यांसाठी चार विशेष गाड्या आणि त्यांच्या प्रत्येक दोन फेर्या आशा 16 गाड्या वारी विशेष म्हणून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नागपूरसह नवी अमरावती आणि खामगाव येथून पंढरपूर आणि पुन्हा परतीचा प्रवास या गाड्या करतील. जळगाव जिल्ह्यातून आणि नागपूर, अमरावती, खामगाव येथून भाविकांना घेवून ही गाडी पंढरपूरात दाखल होणार आहे. नागपूर-मिरज नागपूर ही विशेष गाडी चालविण्यात येईल तसेच ही गाडी पंढरपूरला भाविकांना उतरवून पुढे मिरजेपर्यंत चालवण्यात येईल. तेथूनच ही गाडी पुन्हा नागपूरसाठी सोडली जाईल.
नागपूर-मिरज-नागपूर विशेष गाडी
01115 व 01116 नागपूर-मिरज-नागपूर विशेष गाडी 6 व 9 जुलै रोजी नागपूरहुन सकाळी 8.50 वाजता सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे 7 व 10 जुलै रोजी सकाळी 11.55 वाजता मिरजेत दाखल होईल. परतीच्या प्रवासात 01116 मिरज-नागपूर विशेष गाडी 7 व 10 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता मिरजेहून सुटेल आणि दुसर्या दिवशी 8 व 11 जुलैला नागपुरला दुपारी 12.25 वाजता पोहोचेल. सर्वसाधारण मेल/एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या थांबतील. या गाडीला आठ द्वितीय श्रेणी स्लीपर, सहा द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, दोन वातानुकूलित थ्री टियर आणि दोन एसएलआर एकूण 18 डबे या गाडीला असतील.
नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी
01119 नवी अमरावती-पंढरपूर ही विशेष गाडी 6 व 9 जुलैला नवी अमरावतीहुन दुपारी 2.40 वाजता सूटेल आणि दुसर्या दिवशी 7 आणि 10 जुलैला सकाळी 9.10 ला पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01120 पंढरपूर-नवी अमरावती विशेष गाडी 7 व 10 जुलैला सायंकाळी 7.10 वाजता पंढरपुरहुन निघेल आणि दुसर्या दिवशी 8 व 11 जुलै या दिवशी दुपारी 12.40 वाजता अमरावतीला पोहोचणार आहे.
हे पण वाचा :
पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत सरकार करू शकते मोठी घोषणा
गुडन्यूज : अखेर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या तारखेपासून पुन्हा धावणार
खामगाव-पंढरपूर विशेष गाडी
खामगाव-पंढरपूर विशेष गाडी 7 व 10 जुलै रोजी सोडली जाणार आहे. खामगाव येथून ही गाडी सकाळी 11.30 ला सुटेल आणि दुसर्या दिवशी (8 व 11 जुलै) या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरला पोचेल. परतीच्या प्रवासात 01122 पंढरपूर-खामगाव ही विशेष गाडी 8 व 11 जुलैला सकाळी पाच पंढरपूरहुन निघेल आणि दुसर्या दिवशी 9 व 12 जुलैला खामगांवला संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचेल. या गाडीला सर्वसाधारण मेल, एक्सप्रेसचे सर्व थांबे असतील. या गाडीला आठ द्वितीय श्रेणी स्लीपर, सहा द्वितीय श्रेणी सिटिंग/चेयर कार, दोन वातानुकूलित थ्री टियर आणि दोन एसएलआर एकूण 18 डबे गाडीला असतील.