पाचोरा । शहरातील बाहेरपुरा भागातील एका प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी पहाटे उघडकीस आलीय. प्रकाश धना अंभोरे (वय – ४६) असे मृताचे नाव असून याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश अंभोरे हे हातमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाळा हाकत होते. परिस्थिती हालाखीची, त्यातच हाताला काम नसल्याने आर्थिक विवंचनेतून प्रकाश अंभोरे यांनी दि. ४ जुन रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घराजवळील शाळेच्या छताला दोर आवळुन गळफास लावत आपली जीवन यात्रा संपवली. मयत प्रकाश अंभोरे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले.
हे पण वाचा :
Breaking ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती, आरोग्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संतापजनक ! वर्गमित्रानं केला विवाहित तरुणीवर बलात्कार
प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत ; या सरकारचा मोठा निर्णय
एकनाथ खडसेंवर ईडीची कारवाई ; भाजपच्या खा.रक्षा खडसे म्हणतात..
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रकाश धना अंभोरे यांचे पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी (विवाहीत), एक भाऊ असा परिवार आहे. प्रकाश अंभोरे यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.