नवी दिल्ली : ऐन महागाईत सर्वसामान्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, LPG सिलेंडर (स्वयंपाकाचा गॅस) च्या किंमतीत आज मोठे बदल करण्यात आले आहेत. आज व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 35 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून हे नवीन दर लागू होतील.
या बदलानंतर19 किलोच्या सिलेंडरचीकिंमत 2,219 रुपयांवर आली आहे. यापूर्वी हे सिलिंडर 2,354 रुपयांना मिळत होते. त्याचप्रमाणे, व्यावसायिक सिलेंडरची किंमत कोलकात्यात 2,454 रुपयांवरून 2,322 रुपयांवर, मुंबईत 2,306 रुपयांवरून 2,171.50 रुपयांवर आणि चेन्नईमध्ये 2,373 रुपयांवरून 2,507 रुपयांवर आली आहे. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या महिन्यात दोनदा भाव वाढवण्यात आले होते
यापूर्वी गेल्या महिन्याच्या १९ तारखेला घरगुती एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यावेळी 14 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात 3.50 रुपयांनी तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 8 रुपयांची वाढ करण्यात आली होती. महिनाभरात सिलेंडरच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. याआधीही मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात एकदा वाढ करण्यात आली होती.
हे पण वाचा :
महाराष्ट्रात दुसरा कुणी नेता नव्हता का? काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी, लवकरच किंमती आणखी वाढणार
मान्सून ‘या’ तारखेला धडकणार महाराष्ट्रात
संतापजनक! पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापाने केला ११ वर्षे लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक
नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले
भाव वाढतील अशी अटकळ होती
सरकारी तेल कंपन्या (OMCs) 1 जून रोजी LPG सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करू शकतात अशी अटकळ होती. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत, त्यावरून जूनच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढतील, असे मानले जात होते. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नसले तरी. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासह इतर काही घटकांचा कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा जगभरात डिझेल, पेट्रोल, एटीएफ, एलपीजी आदी महाग झाले आहेत.