नवी दिल्ली – सर्वसामान्यांसाठी मोठी खुश खबर आहे. गेल्या काही महिन्यामध्ये सतत वाढणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडर दर वाढीला ब्रेक लावण्यात आला असून आज शनिवार दिनांक 21 मे पासून एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाले आहे.सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने अचानक मोठा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि व डिझेल च्या (Petrol and Diesel prices) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवरथेट 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोल 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असं मानलं जात आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस) भाववाढीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता मात्र आता सरकारने या प्रकरणी अचानक मोठा निर्णय घेऊन नागरिकांना मोठी भेट दिली आहे.
काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री….
निर्मला सीतारामन म्हणाल्या की,आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याचबरोबर, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर 12 सिलिंडरपर्यंत 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली.
9/12 Also, this year, we will give a subsidy of ₹ 200 per gas cylinder (upto 12 cylinders) to over 9 crore beneficiaries of Pradhan Mantri Ujjwala Yojana. This will help our mothers and sisters. This will have a revenue implication of around ₹ 6100 crore a year. #Ujjwala
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 21, 2022
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलिंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावे लागेल. याठिकाणी कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावे लागेल.