ऑइल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार २८ मे पर्यंत अर्ज करू शकतो.
रिक्त जागांचा तपशील
अधिसूचनेनुसार 922 गैर-कार्यकारी रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल. त्यानंतर PST/PET/कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणी घेतली जाईल.
अर्ज शुल्क
सामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये आहे. तर SC/ST/PWBD/माजी सैनिकांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
सुवर्णसंधी.. आसाम राइफल्समध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मेगा भरती, आताच अर्ज करा
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
मुक्ताईनगरात सराफ दुकानावर दरोडा, तब्बल ३० लाखांचे दागिने लंपास
मोठी बातमी: राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?
अशा प्रकारे करा अर्ज
पहिला टप्पा : अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार प्रथम ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com ला भेट द्या.
दुसरा टप्पा : होमपेजवर पुढील करिअर टॅबवर क्लिक करा.
तिसरा टप्पा : आता उमेदवार अर्जाची लिंक तपासा.
चौथा टप्पा : त्यानंतर अर्ज भरा.
पाचवा टप्पा : आता अर्ज फी भरा.
सहावा टप्पा : त्यानंतर उमेदवार फॉर्म सबमिट करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सातवा टप्पा : शेवटी, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी त्यांच्याकडे ठेवावी.