मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी आज चार मे रोजीचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिलेला होता. यापूर्वी राज ठाकरे यांनी मंगळवारीच मनसेच्या कार्यकर्त्यांना भोंग्यावरून अजान वाजवणाऱ्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरे हे समाजात जातीय तेढ पसरवत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला. 36 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर बोलताना दिसतात.
‘त्या’ व्हिडीओमध्ये काय?
राज ठाकरेंनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत भाषण करताना दिसतात. त्यांनी मुस्लिम बांधवांच्या अजान आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलंय, की…
Enter a Twitter URL
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022