भारतीय दंड संहिता कलम ३०७ म्हणजे नेमकी काय आहे याबाबत थोडक्यात व कायद्याच्या भाषेत समजून घेऊया…. एखाद्या व्यक्ती विरुद्ध पोलिसात भारतीय दंड संहिता कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल कोणता अपराध केल्यानंतर दाखल केला जातो याबाबत आज कायदा माहिती जाणून घेऊ या…
भारतीय दंड संहिता कलम ३०७ केव्हा लावली जाते
हत्येचा प्रयत्न जेव्हा केला जातो त्या वेळेला भारतीय दंड संहिता कलम ३०७ लावली जाते हे झाले साध्या सोप्या भाषेत..
– जो कोणी अशा हेतूने कोणतेही कृत्य करतो, आणि अशा परिस्थितीत की जर तो त्या कृत्याने मृत्यूस कारणीभूत असेल, तर तो खुनाचा दोषी ठरेल, त्याला कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल जी मुदत वाढू शकते. दहा वर्षे, आणि दंडास देखील जबाबदार असेल, आणि अशा कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाल्यास, अपराधी एकतर आजीवन कारावासासाठी किंवा आधी नमूद केल्याप्रमाणे अशा शिक्षेस जबाबदार असेल.
भारतीय दंड संहिता १८६० (IPC 1860) मध्ये नमूद असल्या प्रमाणे मानव शरीरास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी जीवितास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी म्हणजेच खुणाचा प्रयत्न केल्यास कलम ३०७ अन्वये गुन्हा ठरतो. या गुन्ह्यात १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड अशी शिक्षा आहे. सदर गुन्हा दखलपात्र असून अजामीनपात्र आहे.
या गुन्ह्यात जामीन मिळणं अवघड…
कलम ३०७ जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या गंभीर गुन्हयामधे लावले जाते या गुन्हयामधे परिस्थितिचे गांभीर्य पाहुन १० वर्षा पर्यंत कारावास आणि दंडही होऊ शकतो
हा दखलपाञ आणि अजामीनपाञ गुन्हा असलयाने आरोपपञ न्यायालयात दाखल होईपर्यंत जामीन मिळणे अवघड आहे पण जेव्हा संशयित आरोपीवर न्यायालयात केसची कारवाई सुरु होईल आणि खोट्या गुन्हयामधे अडकवले असेल तर संविधानाच्या नियमानुसार जामीन मिळण्याची संधी असते.