नवी दिल्ली : सध्या लिकसभेत महाराष्ट्रातील खासदारांकडून महाराष्ट्रातील प्रश्न मांडले जात आहेत. मात्र, ते मदत असताना खासदारांमध्ये वाढी होत आहेत. काही मुद्यांवरून खासदार आक्रमक पवित्रा घेत आहेत. याचा प्रत्यय लोकसभेत आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान ‘तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात’ असे विधान जितेंद्र सिंह यांनी केले. त्यावर ‘आई-बाप काढू नका’, असे खासदार सुळे यांनी म्हणत सिह यांना चांगलेच सुनावले.
दिल्लीत लोकसभेत चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साडह्ला. यावेळी त्या म्हणाल्या की, “पहिल्या सरकारने 60 वर्षांत काय केल? असे वारंवार सांगितले जात आहे. आता हा डायलॉग जुना झाला. केवळ कलम 370 काढल्याने काश्मिरी नागरिकांच्या आयुष्यात बदल घडत नाही.
2022-23 च्या अर्थसंकल्पात भाजप सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली?’ याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेबद्दल भाष्य केल्यानंतर सुळे आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात शाब्दिक वाद रंगला. यावेळी सुळेंनी मागच्या सरकारला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा प्रश्न सिह यांना विचारला.
हे देखील वाचा :
संतापजनक ! स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेवर मालकाकडून अत्याचार
सिद्धूचा राजीनामा, सोनिया गांधींना पत्र लिहून दिली ‘ही’ माहिती
मंदानाने बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, आगीसारखा झाला व्हायरल
10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर’हे’ काम त्वरित करा
महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती*
या चर्चेदरम्यान ‘तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात’ असे विधान जितेंद्र सिंह यांनी केले. त्यावर आक्रमक झालेल्या सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनाला जबाबदार कोण, काँग्रेस की जगमोहन? असा सवाल केला. तसेच आई बाप काढायचे कारण नाही, असे खडेबोलही सुळे यांनी यावेळी सुनावले.