चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या नवज्योत सिद्धू यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
सिद्धू यांनी सोनिया गांधींकडे राजीनामा पाठवला
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत पत्र शेअर केले आहे. पत्रात सिद्धू यांनी लिहिले की, ‘मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.’
हे देखील वाचा :
मंदानाने बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, आगीसारखा झाला व्हायरल
10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर’हे’ काम त्वरित करा
महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती*
सोनिया गांधी यांनी पीसीसी अध्यक्षांचा राजीनामा मागितला होता
10 मार्च रोजी जाहीर झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी (१५ मार्च) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (पीसीसी) अध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले. मंगळवारीच सोनिया गांधींच्या आदेशानंतर उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोदियाल आणि यूपी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राजीनामा दिला होता.