बोदवड : प्रेमसंबंधाच्या संशयावरून तालुक्यातील मुक्तळ येथील २९ वर्षीय ग्रामपंचायत सदस्यांची संगनमताने मारहाण, गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. शिवाजी गोकुळ पारधी असे मयत सदस्य यांचे नाव आहे. याबाबत बोदवड पोलिस ठाण्यात नऊ संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयीतांना अटक करण्यात आली.
काय आहे घटना?
उच्च शिक्षित असलेले शिवाजी पारधी हे मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत. ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत ६ मार्चला रात्री त्यांचे भाऊ सुनील गोकुळ पारधी यांनी बोदवड पोलिसांत मिसिंगची नोंद केली. दरम्यान, रविवारी रात्री मलकापूर रोडवरील पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी काही वेळातच ओळख पटवली. मृतदेह शिवाजी पारधी यांचा असल्याचे समोर येताच अवघ्या काही तासांत सोमवारी दुपारी २ वाजता संशयितांना अटक केली.
संशयितांमध्ये रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (वय २१), सचिन श्रीधर कोल्हे (वय ३२), श्रीधर रामधन कोल्हे (वय ५९), अमोल श्रीधर कोल्हे (वय ३०), नितीन भास्कर कोल्हे (वय ३२), निर्मलाबाई श्रीधर कोल्हे (वय ५०, सर्व रा.मुक्तळ) व पुंडलिक यशवंत वारके (वय ४९) व पल्लवी पुंडलिक वारके (वय ३६, रा. शिंदी ता.भुसावळ) आदींचा समावेश आहे. घटनेशी निगडीत एका विवाहित तरुणीसोबत मृत शिवाजी पारधी यांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वरील आरोपींनी शिवाजीला मारहाण व गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. नंतर मृतदेह ५ मार्चच्या रात्री दीड वाजता मलकापूर रोडवरील पुलाखाली फेकून दिला होता, अशी फिर्याद देण्यात आली. दरम्यान, मृतदेहाचे बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मुक्तळ येथे अंत्यविधी करण्यात आले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.
हे देखील वाचा :
शिवसेनेला आणखी एक धक्का : आदित्य ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयावर आयकर विभागाचा छापा
विधानसभेत गिरीश महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…? व्हिडीओ व्हायरल
31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा बसेल भुदंड, जाणून घ्या
अपर पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
पोलिसांना घटनास्थळी रक्ताचे नमुने, रक्तमिश्रित माती व काचेच्या बाटलीचे तुकडे, पुलाच्या भिंतीलगत तुटलेली बिअरची बाटली जप्त केली. याप्रकरणी सुनील गोकुळ पारधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींना सोमवारी बोदवड न्यायालयात हजर केल्यावर ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करत आहेत. सोमवारी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तर डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे हे रविवारी रात्रीपासून बोदवड येथे थांबून होते. जळगाव येथील ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाची मदत घेण्यात आली.