नागपूर : दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. भरधाव वाहनाने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघात विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. दिशांत महादेव पटेल असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून ही घटना कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले सर्व विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे आहेत.
नेमकं काय घडलं?
नागपुरात दहावीच्या तिघा विद्यार्थ्यांचा रस्त्यात अपघात झाल्याचं उघडकीस आलं आहे. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना ही घटना घडली.
विद्यार्थी प्रवास करत असलेल्या बाईकला एका वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये बाईकवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.