जळगाव : गुंगीचे औषध देवून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीसात धाव घेत संशयित नराधमाविरुद्ध दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकार?
जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय-२६) याचे अल्पवयीन मुलीशी ओळख होती. याचा गैरफायदा घेत १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला साबीर शेख हा त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीसात धाव घेतली.
हे देखील वाचा :
भुसावळमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
राखी सावंतचा व्यक्तीसोबतचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना फुटला घाम !
आयकर विभागाने दिला इशारा! जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान
पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी वाढणार? जाणून घ्या तज्ञांचे मत
सोन्याचे दर विक्रमी पातळीवर, वाचा जळगावच्या सुवर्ण नगरीमधील दर
अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संशयित आरोपी साबीर शेख जहूर याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.