मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं (Reliance Jio) नेटवर्क शनिवारी जवळपास 8 तास ठप्प होतं. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद अनेकांनी नाहक मनस्ताप सहन करावा लागला. परंतु रिलायन्स जियोने ग्राहकांच्या भावना ओळखून मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत डाटा देण्याची घोषणा रिलायन्स जियोने केली आहे. जियो युजर्सच्या मोबाईलवर कंपनीतर्फे तसा मेसेज पाठवण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा :
खाद्य तेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या कारण?
लता मंगेशकर यांचं निधन … युग संपले !
बँक ऑफ महाराष्ट्र 500 जागांसाठी मोठी पदभरती, जाणून घ्या डिटेल्स
‘या’ बँका देताय बचत खात्यावर ७ टक्के व्याज, जाणून घ्या तपशील
काय आहे मेसेज?
प्रिय जियो ग्राहक, तुमच्या सेवेची गुणवत्ता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आज (शनिवारी) सकाळी, दुर्दैवाने, तुम्हाला आणि मुंबईतील इतर काही ग्राहकांना सेवेत व्यत्यय आल्याचा सामना करावा लागला. आमच्या टीमने या नेटवर्क समस्येचे काही तासांत निराकरण केले, परंतु हा तुमच्यासाठी आनंददायी अनुभव नसावा, अशी आमचा धारणा आहे. आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. आम्ही तुमच्या नंबरवर दोन दिवसांचा अमर्यादित डेटा प्लॅन विनामूल्य जारी करत आहोत, जो आज (शनिवारी) रात्रीपासून लागू होईल. तुमच्या वर्तमान योजनेची वैधता संपल्यावर ही विनामूल्य योजना आपोआप सक्रिय होईल. तुमच्या सेवेच्या अनुभवाला सर्वोच्च महत्त्व देण्यास आमचे प्राधान्य आहे. – जियोकडून प्रेम