औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात प्रसिध्द असा पर्यटनस्थळ समजल्या जाणाऱ्या म्हैसमाळ येथील एका हॉटेलवरदे हव्यापार करणाऱ्या महिलेस एएचटीयू पथक व खुलताबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रंगेहाथ पकडले.या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी सदर महिला, एक मुलगा व हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, म्हैसमाळ येथे गेल्या अनेक महिन्यांपासून काही हॉटेलवर बाहेरून मुली, महिला आणून सर्रास वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध युनिट व खुलताबाद पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे खात्री करण्यासाठी पथकाने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास म्हैसमाळ येथील आर्या हॉटेलवर एक डम्मी ग्राहक पाठवला.
हे सुद्धा वाचा :
10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक
खुशखबर.. PM किसानचा पुढचा हप्ता या दिवशी येणार
सरकार आणखी १० हजार पाचशे जेनेरिक मेडिकल सुरु करण्याच्या तयारीत
खाद्य तेल स्वस्त होणार ; काय आहे कारण जाणून घ्या…
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ‘मानधन’ योजना ; दरमहा मिळतील ३ हजार रुपये
यानंतर हॉटेलच्या आत गेलेल्या डम्मी ग्राहकाने खात्री होताच, पोलिसांना इशारा दिला. इशारा मिळताच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध युनिट व खुलताबाद पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकत देहव्यापाराचा व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल चालक चंद्रकलाबाई भिकाजी साठे आणि महेश अंकुश भालेराव या दोघांना महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असताना रंगेहाथ पकडले. तर हे दोघेही पैसे घेऊन महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.