नाशिक : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाल्याचे समजत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे. मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला हा अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात घडला आहे. बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे.
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात pic.twitter.com/UHNW6orMVH
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) February 4, 2022
या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचासाठी खाजगी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरु केला आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.