नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील निफाड याठिकाणी नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने भयावह पद्धतीने काटा काढला. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने एक लाखाची सुपारी देऊन पतीच्या खुनाची सुपारी जीव घेतला आहे. मृतदेहाची झालेली अवस्था पाहून पोलीस देखील हादरले आहेत. गेली आठवडाभर तपास केल्यानंतर, पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार पत्नीसह तिच्या प्रियकराला देखील बेड्या ठोकल्या आहेत.
पेठ येथील कोटंबी घाटात डस्टर कार एम एच ४३ एडब्ल्यू १३०८ मधे अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी खूनाचा प्रकार असल्याने याप्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी अज्ञात मारेक-याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुठलाही धागेदोरे नसताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ आणि स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना सदर म्रुतदेह निफाड येथील सचिन श्यामराव दुसाने (३० रा. गणेशनगर, निफाड) याचा असल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन दुसाने आणि आरोपी शोभा दुसाने हे पती-पत्नी आहेत. मृत सचिन याला दारुचं व्यसन होतं. दारू प्यायल्यानंतर तो अनेकदा आपली पत्नी शोभा हिला शिवीगाळ करत त्रास द्यायचा. याच रागातून आरोपी पत्नी शोभा हिने पतीविरोधात सूड उगवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने आपला प्रियकर दत्तात्रय महाजनच्या पतीच्या हत्येचा कट रचला. निफाडमधील काही जणांना एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आली.
या प्रकरणात खुनाच्या सुपारीची एक लाखांची रक्कम व मोबाईल, कार असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या खून प्रकरणात दत्तात्रय शंकर महाजन (४३, बांधकाम व्यवसाय, रा. गणेशनगर, निफाड), संदीप किटटू स्वामी (३८, इडली डोसा विक्रेता, सिडको), अशोक मोहन काळे (३० मजुरी रा. कारगिल चौक, दत्त नगर, चुंचाळे), गोरख नामदेव जगताप (४८, धंदा रिक्षाचालक, रा. दुर्गादेवी मंदिराजवळ, राणा प्रताप चौक, सिडको), पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड), मुकरम जहिर अहेमद शहा (२६ रा. विराट नगर, अंबड आयटीआय लिंक रोड) व शोभा सचिन दुसाने (मृताची पत्नी, वय ३० रा. गणेशनगर, निफाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.