अभिनेत्री मुनमुन दत्ताचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर ती व्हिडिओच्या माध्यमातून विविध विषयांवर बोलत असते. मुनमुन दत्ता हिनं गेल्या वर्षी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात काही वादग्रस्त वक्तव्य केली गेली होती. मुनमुन हिनं जाणूनबुजून अनुसूचित जाती समाजाला लक्ष्य केल्याची तक्रार आहे.
युट्युबवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात मुनमून दत्ता हिने एका समुदायाला उद्देशून वक्तव्य केले असल्याची तक्रार दाखल झाली आहे.तिने या प्रकरणी त्या समुदायाची अनेकदा माफी मागितली आहे. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून, तिला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वारंवार माफी मागूनही अटक होणार असल्याने तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. युट्यूबवरील व्हिडीओवर तिने एका समाजाला उद्देशून प्रतिक्रिया दिली असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.