माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करत डिवचलं आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात केलेल्या या ट्विटमध्ये नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले या जमाती एकत्र कुठे पाहिल्या जाऊ शकतात, असा प्रश्न करत ट्विट करून थोडक्यात उत्तरे द्यावे…. रिकाम्या जागा भरा,अशी प्रश्नार्थक ट्विट करून टीका केली आहे.
‘रिकाम्या जागा भरा’ अशा स्वरुपात दुसरा प्रश्न विचारत आघाडीच्या नेत्यांची काही वाक्यं वापरली आहेत. या ट्विटमध्ये अमृता फडणवीसांनी कुणाची नावं लिहिली नसली तरी त्यांचा रोख हा महाविकास आघाडीचे नेते आणि नजिकच्या काळातील काही नेत्यांची वादग्रस्त विधानं याकडे असल्याचं उघड आहे. नेहमीच वेगवेगळ्या मुद्दावरून अमृता फडणीस हे गेले काही दिवस हा विकास आघाडीतील नेत्यांवर टीका करत आहेत. त्यांनी टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या या वक्तव्यानं चांगली खळबळ उडाली आहे.
थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स ;
Naughty नामर्द,
बिगड़े नवाब,
नन्हें पटोले …..
या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !
_____शराब नही होती !
हरामख़ोर का मतलब _____है और
सुनने में आया है _____नामर्द है !#WakeUp #Confused— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 29, 2022