जामनेर,(प्रतिनिधी) – श्री. राजपूत करणी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रविणसिह पाटील यांची नुकतीच निवड झाली असून या निवडीनिमित्त त्यांचे ठिकठिकाणी सत्कार सुरु असून दि, २९ रोजी जामनेर तालुक्यातील मोयगाव येथे भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री राजपूत करणी सेना पदाधिकारी यांचादेखील सत्कार करण्यात आला.
मोयगाव येथील नागरिकांच्या वतीने प्रविणसिहं पाटील यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता प्रसंगी प्रवीणसिहं पाटील बोलतांना म्हणाले की, आता सामाजिक जबाबदारी वाढली असून समाजसेवेसाठी झोकून काम करेल, सामाजिक बांधिलकी जपत समजहिताचे काम केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री राजपूत करणी सेना जिल्हा प्रमुख श्री विठ्ठलसिंह मोरे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री बी,एच, खंडाळकर ,श्री भोई, आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन जामनेर ता,कार्याध्यक्ष श्री सचिनसिंह जाधव ,जामनेर ता,श्री राजपूत करणी सेना सम्पर्क प्रमुख श्री निलेशसिंह सिसोदे व गावकरी समाज बांधव उपस्थित होते.