पुणे: देशासह राज्यावर अद्यापही कोरोनाचं संकट कायम आहे. अशात राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा धादांत खोट्या असल्याचं सांगितलं.
मंत्रिमंडळात मास्क (mask) बाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क हे राहिलंच पाहिजे असं आमचं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
वाईन आणि दारुत फरक
वाईन आणि दारू यात फरक आहे. द्राक्ष आणि काजूतून वाईन तयार केली जाते. अनेक फळातून वाईन तयार केली जाते. वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जेवढी तयार होते तेवढी आपल्याकडे खपत नाही. बाहेरच्या राज्यात किंवा परदेशात निर्यात केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाईनच पितात. पण काहींनी मद्यराष्ट्र म्हटलं आहे. मध्यप्रदेशात तर घरपोच वाईन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षाची मागणी आहे. वाईन विकण्यासाठी काही नियम अटी घालून परवानगी दिली आहे. पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची नियमावली तयार होईल. पण काही लोकांनी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.