नंदुरबार : नंदुरबार रेल्वेस्टेशन जवळ पुरी एक्सप्रेस ट्रेनला अचानक आग आगली आहे. आगिचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. आग लागल्यामुळे स्त्रिया आणि लहान मुले घाबरून गेली होती. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोटामुळे काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
हे देखील वाचा :
महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का? उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
निरोगी राहण्यासाठी दिवसातून एकदा कॉफी प्या, मिळतात हे आरोग्यादायी फायदे
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
Flipkart वर 50 इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा