जळगाव : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या काही नगरपंचयात निवडणुकांचा निकाल लागला आहे. यात सर्वाधिक बोदवड नगरपंचायत निवडणुकीची चर्चा रंगली आहे. कारण याला लागली होती सेना भाजपच्या छुप्प्या युतीची फोडणी. छुप्प्या युतीची चर्चा असतानाच आता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे सगळ्याच्या भुवया उंचावल्या आहेत.
बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, शिवसेनेला समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पराभवाचा धक्का बसला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. परंतु या निवडणुकीचा परिणाम राज्यातील इतर भागावार पडणार असं म्हटलं जात आहे.
हे सुद्धा वाचा :
पार्टनरने रागात व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलेय? अशा प्रकारे अनब्लॉक करा
.. तर ‘या’ एका चुकीमुळे रेल्वेत नोकरी मिळण्यावर आजीवन बंदी लागू शकते
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! आता पुण्यात मिळणार Google मध्ये नोकरी
कारण नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअगोदर जळगावचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात भेट होऊन चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा जळगावच्या राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चा रंगल्या आहेत. जळगाव जामनेरात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकाच गाडीमध्ये बसत चर्चा केली. तर बुधवारी विशेषत: जामनेरमध्ये एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील गेले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.