राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांच्या १५५ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ जानेवारी २०२२ आहे.
या पदांसाठी होणार भरती?
१) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ-०२
२) वैद्यकीय अधिकारी- ३१
३) स्टाफ नर्स-१२२
पात्रता :
१) एमडी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
२) एमबीबीएस
३) बी.एस्सी. नर्सिंग / जीएनएम
वयाची अट :
– २१ जानेवारी २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
– एमबीबीएस व विशेतज्ञ वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षापर्यंत.
अटी व शर्ती:
१) इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्जासह दि.२१/०१/२०२२ रोजी सकाळी १०:०० ते १२.०० वा. या वेळेत तळमजला, नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे उपस्थित रहावे.
२) सदर पदा मधील हयापुर्वी नाशिक जिल्हातील कोविड- १९ सेंटर मध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी हयानां प्राधान्य देण्यात येणार असुन, मागील कोविड काळात कार्यरत स्टाफनर्स हयाना ईमेल व्दारे विचारणा करण्यात आलेली असुन त्याच्या पैकी इच्छुक उमेदवारानां प्राधान्य देण्यात येतील.
३) रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ नेमणुक करणे तथा मुख्यालय बदल करणे बाबत चे सर्व अधिकार समिती ने राखुन ठेवलेले आहेत.
४) कोविड- १९ चे सर्व शासकिय नियम (कोविड अॅपरोप्रियेट बिहेवियर ) पाळण्यात यावे. तसेच आपले कोविड- १९ लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
५) पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. ६) सदर भरतीत सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी यांची प्राधान्यक्रमाने नियुक्ती करण्यात येईल.
७) उपरोक्त पदांसाठी उपरोक्त जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदाकरीता अपेक्षित उमेदवार उपलब्ध न झाल्यास COVID 19 या साथरोगाच्या व्यवस्थापनाकरीता सदरील पदे भरणे आवश्यक असल्याने उक्त शैक्षणिक अर्हता धारक शासकीय सेवेतून सेवानिवृत्त उमेदवार हे सदर पदाकरीता पात्र राहातील.
हे सुद्धा वाचा :
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती
८) वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असून त्यांचा कालावधी ३ महिने अथवा कोविड साथरोग परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत यापैकी नजिकच्या कालावधीकरीता भरण्यात येणार आहे अथवा त्याआधी सदरील पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
(६) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक २५ एप्रिल २०१६ चे शासन निर्णयास अनुसरुन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील.
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
मुलाखतीचे ठिकाण : तळमजला, नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय नाशिक.
नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा