पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे दिराने वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करुन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी तरुण हा विवाहितेच्या पतीचा सावत्र भाऊ असल्याची माहिती समोर आली असून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी वहिनीला देत होता.
त्याचप्रमाणे दिराने वहिनीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सावत्र दिरावर हिंजवडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा (Rape) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 मध्ये घडला होता.
हे सुद्धा वाचा…
बोगस कोरोना लसीकरण प्रमाणपत्र देणे भोवले ; धुळ्यातील आरोग्याधिकारी निलंबित
अरे बापरे.. दारूच्या नशेत बकऱ्याऐवजी पकडलेल्या व्यक्तीची कापली मान
रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा
या योजनेत दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक
25 वर्षीय पीडित विवाहित महिलेने या प्रकरणी शनिवारी (15 जानेवारी) पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेचा सावत्र दीर आहे. ती आंघोळ करतानाचे व्हिडीओ दिराने चित्रिकरण केले. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी वहिनीला गदेत होता. तसेच तिच्या घरी जाऊन दिराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती करुन शारीरिक सबंध ठेवल्याचा आरोप आहे.
हा प्रकार 16 डिसेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला होता. महिलेने लाज-लज्जेखातर आणि समाजात बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नाही. मात्र आरोपीचा त्रास वाढल्याने अखेर तिने पतीसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.