शिरपूर | शिकवणीला गेलेल्या १५ वर्षाच्या मुलीचा चक्कर आल्याने मृत्यू झाला. प्रणाली चौधरी असे मुलीचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील करवंद गावात रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करवंद येथे रविवारी प्रणाली शिकवणीला गेली होती.
शिकवणी सुरू झाल्यावर तिला अचानक चक्कर आल्याने ती कोसळली. त्यानंतर शिक्षकांनी प्रणालीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. कदम यांनी तपासून तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. तेथे मृतदेहाची तीन डॉक्टरांच्या पॅनल मार्फत उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात नोंद झाली.