जळगाव : प्रेयसीला भेटण्यासाठी जाणाऱ्या गुजरातमधील अट्टल गुन्हेगाराला अमळनेर येथून अटक करण्यात आली. कैलास आधार पाटील (वय २८ रा. महादेव नगर सोसायटी, नगम डिंडोली, सुरत) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सुरत सिटी याच्या ताब्यात दिले आहे.
प्रियसीला भेटण्यापूर्वी आवळल्या मुसक्या
आरोपी कैलास पाटील हा पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर अधिक तपास केला असता कैलास पाटील हा रात्री अमळनेर येथे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानंतर मंगरुळ – पारोळा रोडवर एलसीबीच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व पथकातील कर्मचारी व स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी गुजरात राज्य यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून त्यास अटक केली. यानंतर कैलासला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी यांच्या ताब्यात देण्यात आले.