मुंबई : विश्वासाने मित्रांसोबत फिरायला आलेल्या तरूणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
नववर्षाच्या सुरुवातीलाच अंबरनाथ शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत फिरायला आलेल्या तरूणीवर अंबरनाथमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. रविवारी २ जानेवारी रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक परिसरातील धरण परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरूणीने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.