पुणे : पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतल्याने तो सहन न झाल्याने एका 17 वर्षाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी घरमालक असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पायल बाबु चव्हाण (वय १७, रा. कृष्णानगर, मोहमंदवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या आईने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उंड्री येथील एका ४० वर्षाच्या महिलेवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोहमंदवाडी येथे शुक्रवारी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ही उंड्री येथील आरोपी महिलेच्या घरी गेल्या काही महिन्यांपासून घरकाम करीत होती. या महिलेने तिच्यावर पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतला होता. त्यावरुन घरमालकिण हिने पायल हिला सातत्याने त्रास दिला होता. चोरीचा हा आरोप सहन न झाल्याने तिने शुक्रवारी राहते घरी गळफास (Suicide in Pune) घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक दगडे अधिक तपास करीत आहेत.