वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयी वृत्तीच्या पत्नीने थेट आपल्या पतीला गावातीलच एका १४ वर्षीय मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करावयास लावला. ही धक्कादायक घटना आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून पती-पत्नीला अटक केली आहे. मारुती मारबदे तसेच प्रिया मारुती मारबदे दोन्ही रा. (मोटोडा) बेनोडा, अशी आरोपींची नावे आहेत.
आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अल्पवयीन पीडिता आणि पती-पत्नी शेजारी राहत होते. 14 वर्षीय अल्पवयीन पीडिता घरात एकटी होती. यावेळी आरोपी महिलेने तिला घरी बोलावले. पीडिता ही आरोपीच्या घरी आली. त्यानंतर महिलेने तिला तू माझ्या पतीसोबत लग्न कर आणि त्याच्याशी संसार कर, असे म्हटले. त्यानंतर ती दरवाजा बाहेरून बंद करून निघून गेली. अल्पवयीन मुलीशी पतीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयाने हे घृणास्पद कृत्य करावयास लावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आरोपी पतीने पीडितेवर एकटी असल्याचा आणि पत्नीच्या बोलण्यावरून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर आरोपीची पत्नी घरी परतली. त्यानंतर तिने पुन्हा पतीला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या घृणास्पद कृत्यानंतर पीडितेला घडलेल्या घटनेबद्दल कोणाला सांगिल्यास जीवानिशी मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करत केली अटक…
या घटनेनंतर स्वतःची सुटका होताच पीडितेने आपबीती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी आर्वी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. तक्रारीची गांभीऱ्याने दखल घेत पती-पत्नी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच विविध कलमान्वये गुन्हा ( Wardha Crime ) दाखल केला आहे. दोघांनाही अटक करत पुढील तपास पोलीस