यावल प्रतिनिधी | यावल येथे क्षयरोगाच्या आजाराला कंटाळून विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत असे तिरुपती नगरातील शेख जावेद शेख जमील हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेख शाहिस्ता यांना क्षय रोगाचा आजार झाला होता. मागील चार महिन्यांपासून रावेर तालुक्यातील डॉ सुनिल चौधरी यांचेकडे त्यांचा उपचार सुरु होता.
आज रविवार, दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. शेख जावेद शेख जमील हे मुलगी शेख मुनिबा सोबत सावदा येथे मामेबहिनीला बाळ झाल्याने तिला बघण्यासाठी सावदा येथे गेले होते तर त्यांचे आई, वडिल आणि मुलगा भुसावळ येथे माझे मावशीकडे गेले होते. त्यावेळी शेख शाहिस्ता छतास लागलेल्या फॅनला ओढणीने गळ्याभोवती फास लावून आत्महत्या केली.