पुणे : पुणे जिल्ह्यातील शेल पिंपळगाव येथे तरुण-तरुणीने झाडाला एकत्र गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तरुणीने प्राण गमावले, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
शेल पिंपळगाव गावात तरुण- तरुणीने शेताच्या बांधावरील झाडाच्या फांदीला दोघांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावला. या घटनेत तरुणीला गळफास बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण बेशुद्ध असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत, मात्र आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी का घेतला, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
जुन्नर तालुक्यातून हे दोघं नेमके कशासाठी आले होते, याचा चाकण पोलीस शोध घेत आहेत. मात्र प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.