हिंगोली : देशाची सेवा करता यावी असं स्वप्न उराशी बाळगणार्या हिंगोलीच्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. संतोष ज्ञानेश्वर इंगळे या २२ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत असे की, हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी येथील संतोष ज्ञानेश्वर इंगळे याने बीएसएफ साठी अर्ज भरल्यानंतर नाशिक येथे परीक्षा झाली होती. त्यानंतर नागपूर येथे मेडिकल झाले होते. मेडिकलमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने तो निराश झाला होता. यातून ६ डिसेंबर रोजी शेतात असताना विषारी औषध घेतले.
नातेवाइकांनी तात्काळ उपचारासाठी नांदेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान १३ डिसेंबर रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणी अधीक तपास पोलिस करीत आहेत.