गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी या संसर्गजन्य आजाराने जगाला वेठीस धरल्याचे आपण पाहिले आहे मात्र आता कोरोना महामारी येणाऱ्या नव्या वर्षापर्यंत पूर्णपणे नष्ट होईल अशी मोठी खूशखबर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) who ने दिली आहे.
मोठ्या प्रमाणात सुरु असलेले लसीकरण आणि अँटी व्हायरल गोळ्यांची उपलब्धता या शस्त्रांच्या जोरावर जग कोरोना लढा जिंकेल व पुढच्या वर्षांत अर्थात 2022 मध्ये कोरोना महामारीमुक्त होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
‘डब्ल्यूएचओ’ WHO च्या 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी हे महत्त्वाचे भाकीत एका अहवालात केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी महामारी संपवण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचं सांगितलं आहे.
नव्या वर्षात ‘हे’ असतील बदल…
कोरोनामुळे होणारे मृत्यू दर शून्यावर येईल.
कोरोना महामारी समूळ नष्ट होणार नसला तरी महामारी संपेल.
कोरोना महामारीचे लक्षणं सौम्य होऊन सर्दी-तापासारखी असेल.
कोरोना आजारावर शेकडो औषधे उपलब्ध होतील.
जास्तीत जास्त रुग्ण घरीच बरे होतील.
आजारी लोक वगळता जग मास्कमुक्त होईल.