जळगाव : एका ३५ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश नामदेव महाले (वय-३५) रा. सोयगाव जि. औरंगाबाद ह.मु. खंडेराव नगर, जळगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील खंडेराव नगरमध्ये सुरेश महाले हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्याला असून ते मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, सुरेश महाले यांनी रात्री धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.
त्यांचा मृतदेह जळगाव शिरसोली दरम्यान खंबा क्रमांक ४१६/२५ ते २७ दरम्यानच्या डाऊन रेल्वेरूळावर आढळून आला. या संदर्भात उपस्टेशन प्रबंधक अमरचंद मुलचंद अग्रवाल यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लालसिंग बारेला तपास करीत आहेत