आता सरकारने सिमकार्ड बाबत नवीन नियम आणला असून या नियमामुळे आता नऊ पेक्षा जास्त सिमकार्ड एकाच्या नावावर ठेवता येणारं नाही,९ पेक्षा अधिक असलेल्या सिमकार्ड असल्यास आता ते बंद करावे लागणार आहे. सिमकार्ड मुळे अनेक गैरप्रकार होत असल्यानेच सरकारनं नवा नियम आणला आहे. त्याच बरोबर तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत?, तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी एखाद्याने सिमकार्ड घेतलेलं नाही ना? तुमच्या नावावर कोणी सिमकार्ड वापर करून गैरप्रकार तर करत नाही याकरिता आता स्वतः तुम्हाला पाहता येणारं आहे.
तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला सरकारच्या नव्या पोर्टलवर म्हणजेच संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल,तुमच्या नावावर असलेल्या सिमकार्डची माहिती तात्काळ मिळणार आहे. tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
जर तुमच्या आधारकार्डवर असे सिम ऍक्टिव्ह आहे जे तुम्ही वापरत नाही तर त्यांचा भुर्दंड तुम्हाला भरावा लागेल. जर तुमच्या ओळखपत्र वरुन रजिस्टर्ड सिम वरुन चुकीचे आणि बेकायदेशीर गोष्टी सुरू असतील तर तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते
दूरसंचार नियामक विभागानुसार टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर प्रोटेक्शन तयार करण्यात आले आहे. यासाठी tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल देखील सुरु केले आहे. या पोर्टलवर देशभरातील सर्व क्रमांकाचा डेटाबेस अपलोड केला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून स्पॅम आणि फ्रॉड नंबरवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या ID वरून कोणी सिम वापरत असेल तर तुम्हाला त्याची तक्रार करता येणारं आहे.