नवी दिल्ली : देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. आधीच इंधन, गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली असून त्यात गेल्या वर्षभरात मोहरीच्या तेलाच्या किमती जवळपास दुपटीने वाढल्याने महिलांना घरात अन्न शिजविणे कठीण झाले आहे.
मोहरीच्या तेलाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत
अहवालानुसार, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मोहरीच्या तेलाची किंमत 90-95 रुपये प्रति लीटर होती. आता हाच भाव 174 रुपयांवरून 190 रुपये प्रति लिटर झाला आहे. याआधीही 2019 ते 2020 दरम्यान मोहरीच्या तेलात सुमारे 50 टक्के वाढ झाली होती.
तेलाशिवाय अन्न कसे शिजवायचे
मोहरीचे तेल अन्न शिजवण्यासाठी आवश्यक पदार्थ आहे. महागाई टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी या तेलाचा वापर कमी केला आहे. मात्र, मोहरीच्या तेलाशिवाय ते जेवण कसे शिजवायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे.
सरकारची पावले अपुरी ठरली
अहवालानुसार, देशातील मागणीच्या प्रमाणात खाद्यतेलाचे उत्पादन खूपच कमी आहे. अशा स्थितीत स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी खाद्यतेल विदेशातून आयात करावे लागते. खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने सोयाबीन तेल, पामतेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले होते. यासोबतच मूलभूत शुल्कातही कपात करण्यात आली आहे.
वाढत्या महागाईने लोकांचे बजेट बिघडले
सरकारच्या या पावलांचा परिणाम सुरुवातीच्या काही दिवसांत दिसून आला. मात्र, नंतर त्या उपाययोजनाही फोल ठरल्या. त्यानंतर खाद्यतेलाचे भाव सतत गगनाला भिडत आहेत. त्यामुळे लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेट सातत्याने बिघडत आहे.