भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदुरमध्ये सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १९ युवतीचा मृतदेह कब्रस्थान परिसरात आढळल्याने आल्याने खळबळ उडाली होती. शिल्पा तेजराम फुल्लूके असे या युवतीचे नाव आहे. दरम्यान, तिच्या मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली सापडल्याने युवतीची हत्या झाली, की तिने आत्महत्या केली, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्रेयसीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्यामुळे तिची प्रियकराने हत्या केल्याचं समोर आलं आहे.
शिल्पा तेजराम फुल्लूके ही संताजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्याशी लग्न करायला पाहण्यासाठी एक युवक येणार होता. त्यामुळे सामान खरेदीच्या बहाण्याने सकाळी 11 वाजता ती घरातून बाहेर निघाली.शिल्पाचा मृतदेह पालांदुर अड्याळ रस्तावरील कब्रस्थानाच्या जवळ एका निर्जन स्थळी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. तिच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला सुरा आणि विषाची बाटली सापडल्याने मृत्यूचे गूढ वाढले होते. पालांदुर पोलिसांनी घटनेचा उलट सुलट तपास केला.
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याचा राग
तरुणीचा प्रियकर नयन शहारे (वय 19 वर्ष) हा लग्नाची मागणी घालायला शिल्पाच्या घरी आला होता. मात्र शिल्पाच्या घरच्या व्यक्तींनी लग्नाला नकार दिला. याचा राग मनात धरुन प्रियकरानेच शिल्पाच्या हाताची नस कापून खून केला. याची कबुली आरोपीने दिली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.