जळगाव प्रतिनिधी :: तालुक्यातील शिरसोली येथे अमोल प्रकाश धनगर (वय ३२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दरम्यान, आत्महत्यापूर्वी अमोल याच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. यात त्याने सासु सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून मी जीवन यात्रा संपवत आहे, असे नमुद केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे कि, शिरसोली येथील अशोकनगर मध्ये अमोल धनगर आपल्या पत्नी, मुले, आई-वडीलांसोबत राहत होते. त्यांचा बकरी चारण्याचा व्यवसाय असून त्यावर ते आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते. शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकऱ्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री अमोल झोपायला जायाचा. शनिवारी रात्री त्याने वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले होते. तो घरी झोपला होता.
याच दरम्यान, रात्री अमोल याने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्यापुर्वी अमोल याने सुसाईट नोट लिहून व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते.
त्यात आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. कारण माझी सासूबाई आणि सासरा रा. रत्नपिंप्रीचे आहे. ते मला फार त्रास देतात आणि फोन वरती धमकी पण. म्हणून मी माझी जिवन यात्रा संपवत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करा, ही नम्र विनंती. माझा बकरीचा व्यवसाय आहे. त्या बकऱ्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे. जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा आहे.
अमोल त्यांच्या पश्चात १मुलगा २ वर्षाचा वेदांत, १ मुलगी ४ वर्षाचा तेजश्री, पत्नी, वडील, भाऊ आहे. अमोलची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.