धुळे प्रतिनिधी | तालुक्यातील बाभूळवाडी येथे विहिरीत बुडाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. संगीता कोळी असे मृत मुलीचे नाव आहे. ती दहावीची विद्यार्थिनी होती. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बाभूळवाडी गावातील संगीता ज्ञानेश्वर कोळी ( वय १५) ही मुलगी बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती मिळाली नाही. त्यानंतर गावातील नारायण भील यांच्या शेत विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी तिचे पालक आल्यावर संगीताची ओळख पटली. याप्रकरणी अधोक धुडकू कोळी यांच्या माहितीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा तपास करत आहे. मृत मुलीचे गुरुवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.