डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे विविध पदांच्या 231 जागांसाठी भरती होणार आहे. शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
१) शिक्षक (Teacher) – एकूण जागा 231
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं शैक्षणिक ज्ञान चांगलं असणं आवश्यक आहे. उमेदवार चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NET परीक्षा दिली असणं आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
साध्या कागदावर किंवा बायो-डेटा किंवा सीव्हीच्या स्वरूपात केलेला अर्ज या अंतर्गत विचारात घेतला जाणार नाही.
तसंच ई-मेल आयडी किंवा FAX द्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना वाचून घेणं महत्त्वाचं आहे.
उमेदवारांनी अर्ज करताना सेल्फ अटेस्टेड कॉपीज अपलोड करणं महत्त्वाचं असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा