जळगाव : जळगाव-भुसावळ दरम्यान बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गोदावरी रुग्णालय जवळ एका कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून भस्मसात झाली आहे. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
कारचे तापमान वाढल्याचे लक्षात येताच कार चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावून गाडीतील इतर प्रवाशांना खाली उतरवले. दरम्यान, त्याच वेळेस गाडीने अचानक पेट घेतला. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जळगाव अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली.