पळासखेडा : पळासखेडा ते विटनेर दरम्यान तरुणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात होवून jalgavजागीच मृत्यू झाला तर चुलत भाऊ जखमी झाल्याची घटना आज येथे सकाळी घडली.
सविस्तर असे कि, २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु झाली. दरम्यान, सोयगाव येथे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी साहिल विष्णू आराख (वय २४ रा. खुबचंद साहित्या अपार्टमेंट, जळगाव ) हा त्याचा चुलत भाऊ संदेश अशोक आराख (वय २२ रा. समतानगर जळगाव) या सोबत दुचाकी क्रमांक ( एम.एच २८ ५७५३) ने जात होते. यादरम्यान पळासखेडा मिराचेजवळ शिवढाबा या हॉटेलसमोर दुचाकीस्वार साहिल याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले.
यात गाडी पूलाखाली कोसळण्यापूर्वी दुचाकीस्वार साहिल व मागे बसलेला संदेश या दोघांनी दुचाकीवरुन उडी मारली. गाडी पूलाखाली कोसळली तर उडी मारल्यानंतर रस्त्यावरील दगडावर डोके आपटल्याने गंभीर दुखापत होवून साहिल जागीच ठार झाला तर संदेश जखमी झाला आहे.