सांगली : मण्यार जातीच्या सापाने दंश केल्यानंतर भावानंतर बहिणीचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील आळसंद येथे घडली. विराज सुनिल कदम आणि सायली जाधव अशी मृत्यूमुखी पडलेल्या बहिण-भावांची नावे आहेत.
याबाबत असे की, विराज याला 6 ऑक्टोबर रोजी घरी झोपेत असताना मण्यार या अतिविषारी सापाने दंश केला होता. यात सकाळपर्यंत त्याला काय झाले हे कुटुंबाला न समजल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला. विराजच्या रक्षाविसर्जन विधीसाठी त्याची विवाहित बहिण सायली जाधव या माहेरी आल्या होत्या. विराज याच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी होता. गुरूवारी रात्री सर्वजण झोपलेले असताना घरात लपून बसलेल्या त्याच मण्यार सापाने सायली यांनाही दंश केला. तत्काळ सायली जाधव यांना विटा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. परंतू गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेणाऱ्या सायली यांचीही प्रकृती दोन दिवसात बिघडली. अखेर शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान सायली यांचाही मृत्यू झाला.
सापाने दंश केला, भावाचा मृत्यू, बहिणीचाही घेतला चावा
मिळालेल्या माहितीनुसार विराज याला 6 ऑक्टोबर रोजी घरी झोपेत असताना मण्यार या अतिविषारी सापाने दंश केला होता. यात सकाळपर्यंत त्याला काय झाले हे कुटुंबाला न समजल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला. विराजच्या रक्षाविसर्जन विधीसाठी त्याची विवाहित बहिण सायली जाधव या माहेरी आल्या होत्या. विराज याच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी होता. गुरूवारी रात्री सर्वजण झोपलेले असताना घरात लपून बसलेल्या त्याच मण्यार सापाने सायली यांनाही दंश केला. तत्काळ सायली जाधव यांना विटा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. परंतू गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेणाऱ्या सायली यांचीही प्रकृती दोन दिवसात बिघडली. अखेर शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान सायली यांचाही मृत्यू झाला.
एक वर्षाची मुलगी पोरकी
सायली जाधव यांना एक वर्षांची मुलगी आहे. आईला सर्पदंश झाल्यापासून ती आईपासून वेगळी आहे. आईला भेटण्यासाठी ती आतूर झाली असून दररोज हंबरडा फोडत आहे. यामध्ये कुटुंबाची मोठी तारांबळ उडत आहे. अखेर आठ दिवसानंतरसुद्धा तिची ही इच्छा अपुरीच राहिली असून ती आता आईविना पोरकी झाली आहे.