पुणे | एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडीत यश लॉन्स येथे १४ वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. क्षितिजा अनंत व्यवहारे (१४ रा. व्हीआयटी कॉलेज अप्पर बिबवेवाडी, पुणे)असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीने वार केल्यानंतर मुलीचे शिर धडापासून वेगळे झाले.
क्षितिजा ही कब्बडीचा सराव करण्यासाठी बिबेवाडीमधील यश लॉन्स परिसरात इतर मैत्रिणींसोबत गेली होती. मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता तिच्याच नात्यातील असलेला मुलगा (नाव शुभम) हा त्याच्या तीन साथीदारांसह येऊन तिच्याशी बोलत होता. त्यानंतर वाद होऊन त्याने तिच्या इतर मैत्रीणींसमोरच त्यांना कोयता दाखवून धमकावले. त्यानंतर कोयत्याने तिचा गळा चिरला. यात क्षितिजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने तिचा गळ्यावर जोरदार वार केल्याने तिचे शिर धडापासून वेगळे झाले. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा अंदाज आहे.