जळगाव प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली आहे. या खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मारेकरी हा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.
सावखेडा गावातील श्रावण लालचंद भिल उर्फ सोनवणे (वय ४०) यांचा भैय्या मदन पावरा (वय २८) याने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. बुधवारी रात्री श्रावण भिल व भैय्या हे दोघी दारू पिण्यास बसले आणि त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि भैय्या पावरा याने श्रावण याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यात श्रावण यांचा जागीच मृत्यू झाला. मदन पावराने त्याच्या पत्नीशी श्रावण भिल याचे अनैतिक संबधाचा संशयावरून हा खून केला तपासातून समोर येत आहे.
दरम्यान,मदन पावरा याने श्रावण याचा खून केल्यानंतर पोलिस पाटील यांच्याकडे येवून घटना सांगितली. पोलिस पाटील यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले. रात्री घटना घडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.