यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील भानुदास निळकंठ चौधरी (वय-४५) या शेतमजुराने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारच्या रात्री १० च्या सुमारास त्यांनी गळफास घेतला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भानुदास चौधरी हे हात मजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी काल रात्री १० च्या सुमारास अट्रावल शिवारातील कालीदास निळकंठ चौधरी यांच्या शेतातील निंबाच्या झाडावर दोरी बांधुन त्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत यांनी यावल पोलीस स्टेशन मध्ये शेतकरी कालीदास चौधरी यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस अमलदार अशोक जवरे हे करीत आहे . मयत भानुदास चौधरी यांने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही, चौधरी हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी मयत भानुदास चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.